Pune Crime News : तडीपार केलेल्या गुन्हेगारास पुण्यात अटक

एमपीसी न्यूज – पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातून दोन वर्षांकरीता (Pune Crime News) हद्दपार असलेला गुन्हेगार शहरात आल्याची माहीती मिळाल्याने पोलीसांनी त्याला अटक केली आहे. गणेश बाळकृष्ण अडागळे असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

 

याबाबत माहीती अशी – गणेश बाळकृष्ण अडागळे (वय ३६,रा. ८३६ नाना पेठ राजेवाडी पुणे) हा आईला भेटण्यासाठी आला होता. त्याबाबतची माहीती पोलीसांना खबरीकडून मिळाली होती.त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी आपल्या स्टाफसह संबंधित ठिकाणी गेले.त्यावेळी आरोपीने आपले नाव (Pune Crime News) गणेश बाळकृष्ण अडागळे असे सांगितले व तो स्वत: तडीपार असल्याचे सांगितले. त्याने पुण्यात येण्यासाठी कोणी परवानगी घेतली असे विचारले असता त्याने आपण परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट केले.

Chinchwad : बापरे! पिंपरी-चिंचवड शहरात एकाच दिवशी चोरीच्या तब्बल 18 गुन्ह्यांची नोंद

या संदर्भात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी समर्थ पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.अडागळे याच्यावर(Pune Crime News) खुनाचा प्रयत्न, मारामारी, हत्यार बाळगणे असे एकुण सात गुन्हे समर्थ पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.