Pimpri Corona Update : शहरात आज 35 नवीन रुग्णांची नोंद, 9 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (Pimpri Corona Update) शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून शहराच्या विविध भागातील 35 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 9 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 624 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 59 हजार 935 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 154 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. सर्वच रुग्ण  गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. महापालिका रुग्णालयामध्ये एकही रुग्ण दाखल नाही.

Pune Crime News : अवैधरित्या सावकारी केल्याबद्दल एकाला अटक;सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन (Pimpri Corona Update) एकही नाही. 36 मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. आज दिवसभरात 2 हजार 73 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 36 लाख 12 हजार 56 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.