Suicide News : बारावीमध्ये नापास झाल्याने विद्यार्थ्याने उचलले कठोर पाऊल

एमपीसी न्यूज : बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने (Suicide News) पुण्याच्या कोथरूड परिसरातील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नापास झाल्याचे कळताच त्याने नैराश्यातून सहाव्या मजल्यावरून उडी मारली. निखिल लक्ष्मण नाईक (वय 18) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, निखिल हा कोथरूड परिसरातील श्रावणधारा वसाहत (एसआरए इमारत) येथील बिल्डिंगमधील डी. विंगमध्ये सहाव्या मजल्यावर राहत होता. तो गरवारे महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याने बारावीची परिक्षा दिली होती. आज महाराष्ट्रातील बारावीच्या विद्यार्थ्यांचा दुपारी एक वाजता निकाल लागला. या दरम्यान, त्याने आपला ऑनलाईन रिझल्ट तपासला असता, त्याला आपण नापास झाल्याचे समजले. त्यानंतर त्याने दुपारी दीडच्या सुमारास सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या (Suicide News) केली.

Chinchwad : बापरे! पिंपरी-चिंचवड शहरात एकाच दिवशी चोरीच्या तब्बल 18 गुन्ह्यांची नोंद

निखीलचे वडिल रिक्षा चालवितात. तर, आई धुण्याभांड्याची कामं करते. तसेच, मोठा भाऊ नोकरी करतो. मोलमजूरी करून जगणारे हे कुटूंब आहे. निखील अभ्यासात तसा हुशार होता. त्याचा स्वभाव देखील शांत होता. त्यामुळे त्याने उचलेल्या या टोकाच्या पावलाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

यंदाचा बारावीचा निकाल –

आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर झाला. यंदा नियमित विद्यार्थ्यांचा एकूण निकाल 94.22 टक्के इतका लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा ‘कोकणची पोरं हुशार’ हे ब्रीद कायम ठेवत कोकण विभागाने 97.21 टक्के मिळवत सगळ्यांमध्ये बाजी मारली आहे, त्यानंतर नागपूर विभागाने सुद्धा 96.52 टक्के मिळवत चांगली बाजी मारली आहे. दरम्यान मुंबईची यंदा 90.91 इतकीच टक्केवारी आल्याने मुंबईचे टक्केवारीचे स्थान इतर विभागांपेक्षा घसरल्याचे पाहायला मिळत आहे. बारावी परीक्षा 2021 या वर्षीचा एकूण निकाल 94.22 टक्के एवढा लागला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.