HSC Result 2022 : पिंपरी-चिंचवड शहराचा बारावीचा निकाल 94.64 टक्के!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराचा बारावीचा (HSC Result 2022) निकाल 94.64 टक्के निकाल लागला. यात 95 टक्के मुलींनी बाजी मारली. तर, 93.98 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा साडेपाच टक्क्यांनी निकाल घटला आहे. यावेळी बारावीची परीक्षा ऑफलाइन झाली होती.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकाल आज (बुधवारी) दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला. दरवर्षी मे महिन्याच्या शेवटी बारावीचा निकाल जाहीर केला जातो. मात्र, यंदा तांत्रिक कारणामुळे उत्तरपत्रिका तपासणी आणि त्याच्याशी संबंधित कामे लांबली. त्यामुळे निकाल जूनमध्ये जाहीर झाला. बहुतांश पालक आणि मुलांनी घरातच बसून मोबाईल, लॅपटॉपवर निकाल पाहिला. ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन निकाल पाहण्याची सोय नव्हती, अशांसाठी खास शाळांमध्ये व्यवस्‍था केली होती.

पिंपरी-चिंचवड शहरातून 17 हजार 796 विद्यार्थांनी नोंदणी केली होती. 9 हजार 571 मुले, तर 8 हजार 133 असे एकूण 17 हजार 704 विद्यार्थांनी परीक्षा दिली. त्यापैकी 8 हजार 995 मुले आणि 7 हजार 761 मुली असे मिळून 16 हजार 756  परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात 95.42 टक्के मुलींनी बाजी मारली आहे. तर, 93.98 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. चिंचवडमधील चिंतामणी रात्रप्रशालेने आघाडी घेत 100 टक्के यश मिळविले आहेत. शहरातील 34 महाविद्यालयांनी 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.

शहरातील 55 महाविद्यालयांचा शास्त्र व वाणिज्य शाखेचा निकाल 100 टक्‍के लागला आहे. तर, कला शाखेच्या अवघ्या 8 महाविद्यालयांचा निकाल 100 टक्‍के लागला आहे.

HSC Result 2022 Update : बारावीचा निकाल जाहीर! यंदाही मुलींचीच बाजी

100 टक्के निकाल असलेली महाविद्यालये! – HSC Result 2022

विद्या व्हॅली नॉर्थ पॉईंट ज्युनिअर कॉलेज (चिखली), अभिषेक आर्ट कॉमर्स, सायन्स कॉलेज (चिंचवड-शाहूनगर), केंब्रिज आर्ट कॉमर्स, सायन्स कॉलेज (आकुर्डी), एसएनबीपी कनिष्ठ महाविद्यालय (चिखली), डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ सायन्स, एस.एस.एम इंग्लिश मिडीयम, प्रीतम प्रकाश कॉलेज (भोसरी) ॲन्जेल मिकी ॲन्ड मिनी स्कुल, एस, एफ.जैन विद्यालय (चिंचवड), नृसिंह हायस्‍कुल (सांगवी), श्रीमती गोदावरी सेकंडरी स्कूल (चिंचवड), भारतीय जैन संघटना हायस्कूल (पिंपरी), के. जी. गुप्ता कनिष्ठ महाविद्यालय (चिंचवड स्टेशन), मॉडर्न हायस्कूल (यमुनानगर), श्रीमती संजूबेन एस. अजमेरा हायस्कूल (पिंपरी), क्रांतीवीर चापेकर (चिंचवड), कै. नागनाथ मारुती गडसिंग कनिष्ठ महाविद्यालय (चिंचवड), प्रियदर्शनी कनिष्ठ महाविद्यालय (भोसरी), अनुसया वाढोवकर हायस्कूल (चिंचवड), होरायझन इंग्लिश मीडियम स्कूल (दिघी), सरस्वती विश्‍व विद्यालय(निगडी),पी. बी. जोग हायस्कूल (चिंचवड), सिटी प्राइड ज्युनियर कॉलेज, (प्राधिकरण), क्रिएटिव्ह पब्लिक स्कूल (आकुर्डी), एसएनबीपी कनिष्ठ महाविद्यालय (रहाटणी), सुरेश मोरे उच्च माध्‍यमिक विद्यालय (रावेत), ज्ञानज्योती माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय चिखली, युनिव्हर्सल कनिष्ठ महाविद्यालय (बोराडेवाडी), सीएमएस इंग्लिश मिडीयम हायस्कुल, (निगडी), कॉम्प्युटर सायन्स टेक्नॉलॉजी, जानकीदेवी कॉलेज, प्रियदर्शनी ज्युनिअर कॉलेज, ए.पी.जे. कॉलेज (वाकड), क्युसिस इंग्लिश मिडीयम स्कुल (भोसरी), आर्ट, कॉमर्स ॲन्ड सायन्स कॉलेज(भुमकर चौक), किलबिल हायस्कूल (पिंपळे गुरव), नोव्हेल कनिष्ठ महाविद्यालय (चिंचवड), स्वामी समर्थ कनिष्ठ महाविद्यालय (भोसरी), प्रतिभा ज्युनिअर कॉलेज, (चिंचवड), गीतामाता कनिष्ठ महाविद्यालय (एमआयडीसी), सेंट ॲन्स कनिष्ठ महाविद्यालय (निगडी), एसएनबीपी कनिष्ठ महाविद्यालय (पिंपरी), सेंट उर्सुला हायस्‍कुल (आकुर्डी), कमलनयन बजाज कनिष्ठ महाविद्यालय (चिंचवड), संचेती कनिष्ठ महाविद्यालय (थेरगाव, चिंचवड), सरस्वती इंग्लिश मीडियम हायस्कूल (पवारनगर -कुदळवाडी), चिंतामणी रात्रप्रशाला (चिंचवड), राजमाता जिजाउ शिक्षण प्रसारक आर्ट, कॉमर्स, सायन्स(भोसरी), झाकिर हुसेन उर्दू (खडकी), डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी (शाहूनगर, चिंचवड), शिवभूमी विद्या सेंटर (यमुनानगर, निगडी), अमृता कनिष्ठ महाविद्यालय (निगडी), सरस्वती सेंकडरी (कृष्णानगर -आकुर्डी), अभिमान कनिष्ठ महाविद्यालय (निगडी), आबासाहेब चिंचवडे कनिष्ठ महाविद्यालय (चिंचवड).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.