Unauthorized Construction : महापालिकेची अनधिकृत बांधकाम, पत्राशेडवर सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम (Unauthorized Construction) विरोधी विभागामार्फत अनधिकृत बांधकामावर सलग दुसऱ्या दिवशी कारवाई करण्यात आली. चऱ्होली, वाकड भागात कारवाई करण्यात आल्याचे उपअभियंता विजय भोजने यांनी सांगितले.

ताथवडे-पुनावळे येथील सेवा रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या अतिक्रमण पाडण्यात आले. 100 अनधिकृत मिळकतीवर कारवाई करण्यात आली. कारवाईचे क्षेत्रफळ 1 लाख 83 हजार चौरस फूट आहे.

‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत वाकड परिसरातील प्रभाग क्रमांक 26 मध्ये कारवाई करण्यात आली. वाकड ते बीआरटीएस, भुजबळ चौकातील अनधिकृत पत्राशेडवर कारवाई केली. या कारवाईत 62 पत्राशेड पाडले.  अंदाजे 1 लाख 62 हजार चौरस फुट बांधकाम पाडले.

Pune Crime News : तडीपार केलेल्या गुन्हेगारास पुण्यात अटक

‘ई’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्रमांक 3 चऱ्होली फाटा ते दाभाडे सरकार चौक येथील नियोजित 45 मीटर रुंद रस्त्याच्या उत्तरेकडील बाजूच्या अनधिकृत बांधकामावर (Unauthorized Construction) कारवाई करण्यात आले. पत्राशेड, वीट बांधकाम, आरसीसी अशी 20 बांधकामे पाडण्यात आली. अंदाजे क्षेत्रफळ 21 हजार 390 चौरस फुट अनधिकृत बांधकामावार कारवाई करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.