Pune Crime News : पोलीस असल्याचे भासवून कस्टम ऑफिसमध्ये नोकरी लावण्याच्या आमिषाने 51 लाखाची फसवणूक

एमपीसी न्यूज – पोलीस दलात नोकरीसाठी असल्याचे भासवून कस्टम ऑफिसमध्ये नोकरी लावून देतो असे सांगत तिघांकडून 51 लाख रुपये घेत त्यांची फसवणूक करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्र रामचंद्र शिंदे (वय 43) आणि सुलोचना दादू सोनवणे (वय 37) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहे. याप्रकरणी दीपक मोहनलाल मुंदडा (वय 51) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, राजेंद्र शिंदे याने स्वतः पोलिसात नोकरी करत असल्याचे भासवून आणि पोलिसांचा गणवेश परिधान करून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. आणि सुलोचना सोनवणे यांच्या मदतीने फिर्यादी यांचा मुलगा, भाचा आणि पुतण्या यांना कस्टम ऑफिस तिथे नोकरी लावून देतो असे सांगून फिर्यादी कडून 51 लाख 17 हजार रुपये घेत त्यांची फसवणूक केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.