Pune Crime News : काशेवाडीमध्ये जुगार अड्डयावर छापा, दोन लाखांचा ऐवज जप्त, 23 जण ताब्यात

एमपीसी न्यूज – भवानी पेठेतील काशेवाडीत एका जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी 23 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून रोकड व जुगाराचे साहित्य असा 2 लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांची मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काशेवाडीत अन्वय युसुफ खान (56, रा.भवानी पेठ) हा तीन पत्ती जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी काल रात्री छापा टाकला. त्यावेळी जुगार खेळताना 23 जण आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी महाराष्ट्र जुगार अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी हवालदार दत्तात्रय मच्छिंद्र जाधव यांनी फिर्याद दिली आहे. या कारवाईमुळे जुगारवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, काही दिवसांपुर्वी खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत नंदु नाईकच्या जुगार अड्डयावर कारवाई करुन 35 जणांना ताब्यात घेण्यात आले होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.