Pune Crime News : मोबाईल चोरल्यामुळे हॉटेल मालकाकडून मारहाण, ग्राहकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – मोबाईल चोरल्याच्या कारणावरून हॉटेल मालक आणि कामगारांनी केलेल्या बेदम मारहाणीत मध्ये एका ग्राहकाचा मृत्यू झाला. पुण्याच्या हडपसर परिसरातील एका हॉटेलमध्ये गुरुवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून मारहाण करणाऱ्या दोघांना अटक केली आहे.

रवी दिपूला राठोड (वय 30) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी हॉटेल मालक दादा उर्फ अनिल अंकुश मोरे (वय 35) आणि वेटर बाबुराव रघुनाथ जाधव (वय 29) या दोघांवर हडपसर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सुरेश दिपलू राठोड (वय 28) यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, हडपसर परिसरातील गोपाळपट्टी येथे आरोपी दादा उर्फ अनिल अंकुश मोरे याच्या मालकीचे शिवशाही व्हेज नॉनव्हेज हॉटेल आहे. मयत रवि राठोड हा गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास इडली घेण्यासाठी या हॉटेलमध्ये आला होता. यावेळी त्याने हॉटेल मालकाचा मोबाईल चोरला.

दरम्यान मोबाईल सोडल्याचे लक्षात आल्यानंतर हॉटेल मालक आणि वेटरने त्याला बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने रवी राठोड यांचा मृत्यू झाला. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.