Pune Crime News : हरणाची शिंगे विक्रीसाठी घेऊन आलेल्या एकाला अटक

एमपीसीन्यूज : सांबर जातीच्या हरणाची शिंगे विक्रीसाठी घेऊन आलेल्या एकाला दत्तवाडी पोलिसांनी जेरबंद केले. चंद्र दानसिंग आवजी (वय 29, रा. सहकारनगर ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून सांबर जातीच्या हरणाची शिंगे जप्त करण्यात आली.

या प्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात भारतीय वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 च्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी, पोलीस हवालदार कुंदन शिंदे आणि अमित सुर्वे यांना तळजाई वनविहार परिसरात एक जण सांबर जातीच्या हरणाची शिंगे विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार दत्तवाडी पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

त्याच्या अंगझडती पोलिसांना सांबर जातीच्या हरणाचे शिंग सापडले. पोलिसांनी हे शिंग जप्त केले असून आरोपीला अटक केली.

त्याने हे शिंग कोणाकडून आणले, तो हे कोणाला भेटणार होता, त्याचा तपास आता दत्तवाडी पोलिस करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.