Pune Crime News: बहिणीशी प्रेमसंबंध असल्याचा रागातून दोन अल्पवयीन मुलांकडून एकाचा खून

एमपीसी न्यूज – पुण्याच्या वानवडी पोलीस स्टेशनचा हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बहिणीबरोबर प्रेम संबंध असल्याच्या रागातून दोन अल्पवयीन मुलांनी एका 18 वर्षीय मुलाचा चाकूचे वार करून खून केला.

आयान (वय 18) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की मयत आयान त्याचे एका मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. त्याची माहिती मुलीचा भावांना समजली होती यावरून त्यांच्यात आधी भांडणही झाले होते, मात्र त्यांनी हे भांडण मिटवण्यासाठी प्रयत्न केले.

आयान याला सिगरेट पिण्याची सवय होती. दरम्यान या दोघा अल्पवयीन मुलांनी याला सिगरेट पिण्यासाठी एम्प्रेस गार्डन परिसरात नेले. त्याला सिगारेट पिण्याची दिली. तो खाली बसून सिगरेट पीत असताना त्यातील एकाने त्याच्यावर चाकूने हल्ला केला आणि त्याचा जीव जाईपर्यंत त्याच्यावर ते चाकूचे वार करत राहिले. जीव गेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी त्याचा मृतदेह जवळच असणाऱ्या कॅनॉलमध्ये टाकला आणि तिथून पळ काढला.

दरम्यान अशाप्रकारे खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी नाना पेठेत या दोघांनाही फिरत असताना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यांनी खून केल्याची कबुली दिली. वानवडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.