Pune Crime News : स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; तीन तरुणींची सुटका तर दोघांना अटक

एमपीसी न्यूज- पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील आशियाना पार्क को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत स्पाच्या नावाखाली सुरू असणाऱ्या (Pune Crime News) वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या ठिकाणाहून पोलिसांनी 24, 28 आणि 43 वर्षीय तीन महिलांची सुटका केली. तर याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

नजमूल सुतवली हुसेन (वय 19) आणि रिपुल आलम (वय 19) या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर जागामालक आणि स्पाचालक या दोघांचा शोध सुरू आहे. पोलीस हवालदार तुषार भिवरकर यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

MPC News Podcast 15 February 2023 – ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, कोरेगाव पार्क परिसरातील उच्चभ्रू असलेल्या फेमिना स्पा मध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी माहितीची खात्री जमा करून संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्यांना तीन महिला वेश्याव्यवसाय करताना (Pune Crime News) आढळून आल्या. पोलिसांनी त्यात तिघींची सुटका केली असून दोघांना अटक केली आहे. अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.