Pune Crime News : लोन काउन्सिलरकडूनच स्टेट बँक ऑफ इंडियाची 47 कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज- स्टेट बँक ऑफ इंडियाचा ऑटो लोन काउन्सिलर (Pune Crime News) असलेल्या एका व्यक्तीनेच बँकेची तब्बल 47 कोटी 65 लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. युनिव्हर्सिटी रोड शाखा आणि टिळक रोड शाखेत हा प्रकार घडला.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य नंदकुमार शेठिया (रा. प्रेम नगर हाउसिंग सोसायटी बिबवेवाडी) याच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2017 ते 2019 च्या कालावधीत हा सर्व प्रकार घडला.

Pune Crime News : स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; तीन तरुणींची सुटका तर दोघांना अटक

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या युनिव्हर्सिटी शाखा आणि टिळक रोड शाखेत 2017 ते 2019 या कालावधीत मंजूर करण्यात आलेली 46 वाहन कर्ज प्रकरणे संशयित असल्याचे ऑडिटमध्ये निष्पन्न झाले होते. हे वाहन कर्ज करून देणारे बँकेचे ॲटो लोन काउन्सिलर आदित्य शेठ या यांनी आणि त्याच्या इतर साथीदारांनी कटकारस्थान करून बँकेची फसवणूक केली. खोटे व बनावट कोटेशन टॅक्स इन्व्हाईस मार्जिन आणि फुल पेमेंटच्या रिसीट तयार करून ते खरे असल्याचे भासवले.

त्यानंतर बँकेतून मोठ्या रकमेचे वाहन कर्ज मंजूर करून घेतले. त्यातील काही प्रकरणात सुरुवातीला इतर खात्यावर रक्कम वर्ग केली नंतर संबंधित वाहन कर्जदार यांच्या नावावर ही रक्कम वर्ग करत बँकेची 47 कोटी 65 लाख 26 हजार रुपयांनी फसवणूक केली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला (Pune Crime News) असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.