Pune Crime News : येरवड्यातील मेंटल हॉस्पिटल अधीक्षकाच्या शासकीय निवासस्थानी जबरी चोरी

एमपीसी न्यूज – येरवडा येथील मेंटल हॉस्पिटलच्या अधीक्षकाच्या शासकीय निवासस्थानात जबरी चोरीचा प्रकार उघडकीस आला. अज्ञात चोरट्यानी रोख रक्कम आणि मोबाईल चोरून नेल्याचे समोर आले आहे. त्यांचे सासू-सासरे घरात असताना ही चोरी झाली आहे. याप्रकरणी लाईन डफेदार विनोद पायमपल्ली (वय 45) यांनी तक्रार दिली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे येरवडा मनोरुग्णालयात लाईन डफेदार आहेत. येरवडा मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. फडणीस हे त्यांच्या कुटुंबासोबत शासकीय निवासस्थानातील बंगला नंबर एक येथे राहतात.

काही दिवसांपूर्वी फडणीस यांचे सासू सासरे त्यांच्याकडे राहण्यासाठी आले होते. दोन दिवसांपूर्वी (दि. 10) त्यांचे सासू-सासरे खोलीचा दरवाजा बंद करून झोपले असताना अज्ञात चोरट्याने दरवाजा ढकलून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील रोख रक्कम, मोबाईल आणि इतर साहित्य चोरून नेले. येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.