_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Chakan Crime News : आधारकार्ड काढण्यासाठी आई सोबत गेलेल्या सात वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे

एमपीसी न्यूज – आधारकार्ड काढण्यासाठी आईसोबत गेलेल्या सात वर्षीय मुलीसोबत दुकानदाराने अश्लील चाळे केले. याबाबत पीडित मुलीच्या आईने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

_MPC_DIR_MPU_II

त्यानुसार दुकानदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 11) चाकण परिसरातील वेदांत संकुल येथील एका मोबाईल शॉपी मध्ये घडला. पवन सुरेश कोळपकर (रा. मुटकेवाडी, चाकण) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या सात वर्षीय मुलीला आधारकार्ड काढण्यासाठी आरोपीच्या दुकानात घेऊन गेल्या. आरोपी दुकानदाराने फिर्यादी यांच्या सात वर्षीय मुलीला हाताचे ठसे घेण्याच्या बहाण्याने जवळ बसवले. तिथे मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवले आणि तिच्यासोबत अश्लील चाळे करून विनयभंग केला. याबाबत दुकानदार आरोपीच्या विरोधात विनयभंग आणि पोक्सो नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.