Pune Crime News : कोरेगाव पार्कमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेले सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, नऊ तरुणीची सुटका

एमपीसी न्यूज – पुण्यातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोरेगाव पार्क मध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेले सेक्स रॅकेट पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणले. पोलिसांनी या ठिकाणाहून वेश्या व्यवसाय करणाऱ्या तरुणीची सुटका केली तर तर दोघांना अटक केली.

शुभम प्रेमकुमार थापा (वय 22) आणि अफताबुद्दीन नुरुद्दीन (वय 27) या दोघांना अटक करण्यात आली. तर चांदबिबी रमजान मुजावर आणि अब्दुल असिफ हे दोघे फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, कोरेगाव पार्कमध्ये योगनिद्रा स्पा आणि फेमिना स्पा या दोन ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी बनावट गिऱ्हाईक पाठवून खात्री केली असता या ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांच्या एका टीमने या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली.

याठिकाणाहून वेश्या व्यवसाय करताना आढळून आलेल्या दोन मुलींची सुटका करण्यात आली आहे. या सर्व मुलींना सुरक्षिततेसाठी महिला संरक्षण गृहात ठेवण्यात आले आहे. तर स्पा मॅनेजर असलेल्या दोन तरुणांना अटक करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.