Pimpri Corona Update : शहरात आज 2518 नवीन रुग्णांची नोंद, 1315 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 2 हजार 518 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (गुरूवारी) नोंद झाली तर 1 हजार 315 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 67 जणांचा मृत्यू झाला.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 1 हजार 315 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील 42 आणि महापालिका हद्दीबाहेरील 25 अशा 67 जणांचा आज मृत्यू झाला. त्यात 44 पुरुष आणि 23 महिला रुग्णांचा समावेश आहे.

शहरात आजपर्यंत 2 लाख 23 हजार 966 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 1 लाख 98 हजार 690 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 3215 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 1629 अशा 4 हजार 844 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला.

सध्या 6 हजार 845 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 3728 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 4 लाख 18 हजार 375 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.