Pune Crime News : भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेसोबत सहा वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू 

एमपीसी न्यूज –  भरधाव टँकरचालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिलेसोबत असलेल्या सहा वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. अपघातत महिला गंभीररित्या जखमी झाली आहे. हा अपघात काल दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मंगळवार पेठ परिसरातील आरटीओ चौकात घडला.

_MPC_DIR_MPU_II

दत्तात्रय भारत थोरात (वय 6, रा. शिवनेरी नगर, कोंढवा ) असे ठार झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. मनिषा थोरात असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी भारत थोरात (वय ३५, रा. कोंढवा ) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टँकरचालक राम बाबू खाडे (वय 23, रा. आव्हाळवाडी, शिरूर , बीड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.

काल दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी भारत थोरात यांच्या वहिनी मनिषा दुचाकीवरून दत्तात्रयला घेउन चाकणकडे जात होत्या. त्यावेळी आरटोओ चौकात पाठीमागून भरधाव वेगात टँकर चालवून रामने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे मनीषा चिमुरड्यासह खाली पडल्यामुळे दत्तात्रय गंभीररित्या जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर मनिषा यांना गंभीर जखम झाली आहे. अपघातानंतर टँकरचालक राम पळून गेला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.