Pune crime News : संशयी पतीने गळा दाबून केला दुसऱ्या पत्नीचा खून

आरोपी सुरेंद्र साळुंके याचा टुरिस्टचा व्यवसाय आहे. त्याची दोन लग्न झालेली आहे. मयत अपर्णा ही त्याची महाविद्यालयापासूनची मैत्रीण होती.

एमपीसीन्यूज : दोन बायकांचा दादला असलेल्या एकाने केवळ संशयावरून दुसऱ्या पत्नीचा गळा दाबून खून केला. पुण्याचा हडपसर परिसरात ही घटना उघडकीस आली.

अपर्णा महाडिक (वय 36) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी पती सुरेंद्र प्रकाश साळुंखे (वय 42) याला ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हडपसर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेंद्र साळुंके याचा टुरिस्टचा व्यवसाय आहे. त्याची दोन लग्न झालेली आहे. मयत अपर्णा ही त्याची महाविद्यालयापासूनची मैत्रीण होती. दोन्ही पत्नी पुण्यातच वेगवेगळ्या ठिकाणी राहत होत्या.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपर्णा महाडिक हिला बाहेर नोकरी करायची होती. तर सुरेंद्र साळुंखे याचा विरोध होता. तसेच तो तिच्यावर संशय घ्यायचा.

त्यामुळे त्यांच्यात सारखे भांडण होत असतं. नेहमीप्रमाणे गुरुवारीही त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर संतापाच्या भरात सुरेंद्र साळुंके याने अपर्णा बोडके हिचा गळा दाबून खून केला. आणि तो घराच्या बाहेर पडला.

काही वेळानंतर घराशेजारी राहणाऱ्या इतर नागरिकांना काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले. त्यांनी हडपसर पोलिसांना फोन करून याची माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता हा खुनाचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी आरोपी सुरेंद्र साळुंखे याला ताब्यात घेतले. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.