Pune Crime News : ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणाऱ्या दाम्पत्याला ठार मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणार्‍या दाम्पत्याने ही निवडणूक लढवू नये, यासाठी त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तिघांविरोधात पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष धुमाळ, अंकुश तोंडे आणि राहुल रमेश अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अर्जुन सिद्धू गोरड (वय 36) यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गोरड दाम्पत्य मुळशी तालुक्यातील खेचरे गावात राहतात. रविवारी रात्रीच्या सुमारास ते दुचाकीवरुन जात असताना आरोपींनी त्यांची दुचाकी अडवली आणि “तुम्ही दोघेही ग्रामपंचायत निवडणुकीचा फॉर्म भरू नका, ही निवडणूकही लढवू नका, अन्यथा जीवे मारु” असे म्हणत दोघांना शिवीगाळ आणि दमदाटी केली.

दुसऱ्या दिवशीही सकाळी आरोपींनी फिर्यादी यांच्या घरासमोर जात फिर्यादीच्या पत्नीला ग्रामपंचायत निवडणूक लढवू नये यासाठी शिवीगाळ आणि दमदाटी केली. पोलिसांनी तीनही आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.