Pune Crime News : “भाईच्या परवानगीशिवाय मंडप का टाकलास”, रमजाननिमित्त हॉटेल सुरू करणाऱ्या व्यक्तीला खंडणीची मागणी

एमपीसी न्यूज – रमजान महिन्यात मोकळी जागा घेऊन त्या ठिकाणी हॉटेल चालवणाऱ्या एका (Pune Crime News )व्यक्तीला नागरिक अधिकार मंच या संघटनेसाठी पाच लाख रुपये खंडणीची मागणी करण्यात आली. कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला. याप्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
समीर पठाण आणि अन्वर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. अब्दुल रहमान अहमद शेख (वय 49) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Pune News : श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात 21 हजार सूर्यफुलांची आरास

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांनी कोंढवा परिसरातील पारगेनगर येथे मोकळी जागा भाड्याने घेऊन त्या ठिकाणी रमजाननिमित्त हॉटेल सुरू केले आहे. दरम्यान या ठिकाणी हॉटेलचे काम सुरू असताना फिर्यादी यांच्या ओळखीचा आरोपी अन्वर त्या ठिकाणी आला. भाईच्या परवानगीशिवाय तू मंडप का टाकलास. तुला ते जड जाईल अशी धमकी देऊन भाई को आके मिल असे सांगितले.
त्यानंतर फिर्यादी हे घाबरून आरोपी समीर पठाण याला भेटण्यासाठी त्याच्या कार्यालयात गेले. यावेळी समीर पठाण यांनी तुझ्याकडे भरपूर पैसा आहे. भाड्यापोटी तू तीन लाख रुपये देऊ शकतोस तर माझ्या नागरिक अधिकार मंच या संघटनेसाठी पाच लाख रुपये दे अशी खंडणी मागितली.
पैसे नाही दिले तर तू पाच ते सहा महिने बाहेर फिरू शकणार नाहीस अशी (Pune Crime News )धमकी दिली.  कोंढवा  पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.