Pune Crime News : विमानाचे बनावट तिकीट आणि कॅनडाचा बनावट व्हिसा वापरून फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील तरूणाला अटक

एमपीसी न्यूज: पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते व्हँनकूवर (कॅनडा) या मार्गावरील एअर इंडियाचे बनावट तिकीट तयार करून आणि कॅनडाचा बनावट विजा तयार करून तो खरा असल्याचे भासवून फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील तरुणाला अटक करण्यात आली आहे. विमानतळ पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार 9 डिसेंबर रोजी घडला.

असीम रवींद्र गोगटे (वय 30, रा. कुमार क्लासिक औंध पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पुणे विमानतळावर स्विफ्ट इन्चार्ज म्हणून कार्यरत असणाऱ्या अरविंद कुमार सिंग (वय 41) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, असीम गोगटे याने 9 डिसेंबर रोजी पुणे नागरी विमानतळ येथे अनधिकृतपणे प्रवेश केला. यावेळी त्या ठिकाणी असणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्याचा संशय आला असता त्यांनी त्याच्याजवळील कागदपत्रांची पाहणी केली असता पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते व्हँनकूवर (कॅनडा) या मार्गावरील एअर इंडियाचे बनावट तिकीट आणि कॅनडाचा बनावट विजा त्याच्याजवळ आढळला. विमानतळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.