-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune Crime : अनलॉकनंतर पुन्हा सेक्स रॅकेट सक्रिय, वारजेत लॉजमधून दोन मुलींची सुटका

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनच्या काळात काही थंड झालेले सेक्स रॅकेट अनलॉकनंतर पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. कारण पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुणे-बंगळूर महामार्गावरील लॉजमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. त्याठिकाणाहून दोन मुलींची सुटका करीत तिघांना अटक करण्यात आली आहे.

जितेंद्र उर्फ जितू बाबासाहेब नंदिरे (वय 32), रामकीसन व्यंकट जाधव (वय 35) आणि एका महिलेला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून शहरात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर लॉजमध्ये अवैधरित्या वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे या कारवाईवरुन स्पष्ट झाले. पुणे- बंगळूर महामार्गालगत वारजेतील एका लॉजमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती पोलीस कर्मचारी संतोष भांडवलकर यांना मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी साई एक्झिक्युटिव्ह’ लॉजवर छापा टाकून दोन मुलींची सुटका केली. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस तपास करीत आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.