Pune Crime : धक्कादायक! सरकारी बाल निरीक्षण गृहातून 7 अल्पवयीन मुले गेली पळून

एमपीसी न्यूज : एकीकडे पुण्यामध्ये गुन्हेगारीचे (Pune Crime) प्रमाण वाढत असताना दुसरीकडे मात्र पुण्यातील सरकारी बाल निरीक्षण गृहातून वेगवेगळ्या गुन्ह्यात सामील असलेली चक्क सात अल्पवयीन मुले पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना येरवडा येथील सरकारी बाल निरीक्षण गृहात घडली आहे.

हा सर्व प्रकार सोमवारी मध्यरात्री घडला आहे. हे सातही जण विविध गुन्ह्यात आरोपी होते. सोमवारी रात्री 11 ते 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच हे सातही जण शिडीच्या सहाय्याने पळून गेले आहेत. पोलिसांमार्फत शोध मोहीम सुरू आहे.

एकीकडे कोयता गॅंगची दहशत सुरू असताना निरीक्षण गृहातून मुले (Pune Crime) पळून जाण्याची घटना ही कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणारी आहे. पुण्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.