Pune – माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य; नदीपात्रात मिळाला 2 दिवसाच्या मुलीचा मृतदेह

आजही 'ति'च्या जन्माला नकार

एमपीसी न्यूज-  2  दिवसाच्या मुलीचा मृतदेह नदीपात्रात मिळाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आज मंगळवारी (दि.27) दूपारी साडेतीन च्या दरम्यान डेक्कन येथील गरवारे महाविद्यालयाजवळील नदीपात्रात हा मृतदेह मिळाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,  डेक्कन येथील गरवारे महाविद्यालयाजवळील नदीपात्रात दोन दिवसाच्या मुलीचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली . मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ससुण रूग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालावर पुढील तपास डेक्कन पोलिस करतील.घडलेल्या प्रकारामुळे सर्वच स्तरातुन हळहळ व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.