Pune Division Corona Update : कोरोनामुक्त रुग्णांचा टक्का वाढला; 73.14 टक्के रुग्ण बरे

विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 50 हजार 837 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 5 हजार 660 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.69 टक्के आहे.

एमपीसी न्यूज – पुणे विभागातील बरे होणाऱ्या रुग्णांचा टक्का वाढला आहे. मंगळवारी आलेल्या आकडेवारीनुसार बरे होणा-या रुग्णांची टक्केवारी 72.8 होती. बुधवारी आलेल्या आकडेवारीमध्ये ती टक्केवारी वाढून 73.14 टक्के इतकी झाली आहे. कोरोनामुक्तांची वाढणारी टक्केवारी दिलासादायक आहे.

सध्या पुणे विभागात कोरोना रुग्णांची संख्या 2 लाख 10 हजार 367 झाली आहे. त्यातील 1 लाख 53 हजार 870 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

तर ॲक्टीव रुग्ण संख्या 50 हजार 837 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 5 हजार 660 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.69 टक्के आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

बुधवारी (दि, 26) रोजी रात्री नऊ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, आजपर्यत विभागामध्ये एकुण 9 लाख 78 हजार 119 नमून्याचा तपासाणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 10 हजार 367 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 918 ने वाढ झाली आहे.

यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 244, सातारा जिल्ह्यात 485, सोलापूर जिल्ह्यात 250, सांगली जिल्ह्यात 499 तर कोल्हापूर जिल्ह्यात 440 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे जिल्हा – पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 53 हजार 141 रुग्णांपैकी 1 लाख 18 हजार 590 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 30 हजार 887 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 664 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.39 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 77.44 टक्के आहे.

सातारा जिल्हा – सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 11 हजार 138 रुग्णांपैकी 6 हजार 300 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 505 आहे. कोरोनाबाधित एकूण 333 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा – सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 16 हजार 659 रुग्णांपैकी 12 हजार 40 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 921 आहे. कोरोनाबाधित एकूण 698 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा – सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 9 हजार 385 रुग्णांपैकी 5 हजार 36 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 989 आहे. कोरोनाबाधित एकूण 360 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा – कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 20 हजार 44 रुग्णांपैकी 11 हजार 904 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 535 आहे. कोरोनाबाधित एकूण 605 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.