Pune : खडकमाळ आळी, महात्मा फुले पेठ परिसरात 15 हजार मास्कचे वाटप

एमपीसी न्यूज – कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रभाग क्र. 18 (क) खडकमाळ आळी-महात्मा फुले पेठ परिसरातील नागरिकांना नगरसेवक अजय खेडेकर यांनी 15 हजार मास्कचे वाटप केले.

खासदार गिरीश बापट व आमदार मुक्ता टिळक यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी ( दि. २८ मार्च) हा उपक्रम राबविण्यात आला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भागिरथी चाळ, शितळादेवी चौक परिसर, शितळादेवी मंदिर, शार्दुल मित्र मंडळ, ६० गुरुवार पेठेचा भाग, कृष्णाहट्टी चौक परिसर, भांडेवाले धर्मशाळे शेजारील व समोरील भाग, बँक ऑफ महाराष्ट्र समोरील व शेजारील परिसर, इच्छापुर्ती गणपती मंडळ गल्ली, अंबामाता मंदिर, फुलवाला चौकाचा भाग, गुरुवार पेठ पोस्ट ऑफिस, जैन मंदिर, सुंदर गणपती मंडळ ते सुभानशहा दर्ग्या पर्यंतच्या भागात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. चौथ्या टप्प्यात या भागामध्ये राहणाऱ्या नागरिक बंधू भगिनींना ४ हजार मास्क, असे एकूण १५ हजार मास्कचे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रभाग अध्यक्ष राजू काकडे, जयसिंग रजपूत, राहुल कोसंदर, योगेश वेदपाठक, राजू थोरात, नंदू पवार,रामभाऊ सोनी, विनोद सोनी, निलेश इंगुळकर, संजय पोळ, घनश्याम ओझा,जालिंदर लिंबोरे,रवी सहाणे, हरून भाई, नितिन नाईक, प्रदीप गायकवाड, शुभम शिंदे, विशाल जाधव, हिरामण जाधव व महानगरपालिकेचे कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक व गणपती मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, अशी माहिती नगरसेवक अजय खेडेकर यांनी दिली.

या व्यतिरिक्त पोलीसांना पाणी वाटप, नागरिकांना गॅस वाटप, तसेच भाजी मार्केट व किराणा दुकानासमोर पाच फूट अंतरावर उभे राहण्यासाठी पांढरे पट्टे मारणे आदी सेवाभावी कामे आपण स्वतः काम करीत असल्याचेही खेडेकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.