Pune Division corona update  : पुणे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट 36 वरुन 20 टक्क्यांवर

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लादले आहेत. त्यानंतर एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला असून, तो 36 वरुन 20 टक्क्यांवर आला आहे.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध लादले आहेत. याचा सकारात्मक परिणाम निदर्शनास येत आहे. जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी रेट 16 टक्क्यांनी कमी झाला आहे. बारा तासांचा नाईट कर्फ्यू, रात्रीची जमावबंदी आणि आत्ताचा विकेंड लॉकडाऊन या गोष्टीचा फायदा झाला असल्याचे राव म्हणाले.

जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण केले जात आहे. आज आणि सोमवारी एक लसीचे डोस आपल्याला मिळणार आहेत. तसेच, चाचण्यांची संख्या देखील वाढवली असून दररोज 31 हजार चाचण्या पूर्ण केल्या जात आहेत असे राव म्हणाले.

दरम्यान, पुणे जिल्ह्यात सध्या सर्वाधिक 91 हजार 634 सक्रिय रुग्ण आहेत. तर, पुणे विभागात 1 लाख 11 हजार 571 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.