Pune news : पुणे स्टेशनवर एका वृद्ध प्रवासी महिलेला रेल्वे कर्मचाऱ्यांनी मदत केली

एमपीसी न्यूज : रेल्वे कर्मचारी आपल्या कर्तव्या सोबतच सामाजिक कार्य करत मानवीय व सहानुभूतीने लोकांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतात.(Pune news) याचे ताजे उदाहरण आहे की नुकतेच पुणे स्टेशन वरील एका घटनेत रेल्वे कर्मचारी, रेल्वे सुरक्षा बल स्टाफ आणि सामाजिक संस्थेने एका वृद्ध, असहाय्य महिलेला वेळेत मदत केली त्यामुळे ती पुन्हा आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचली.

पुणे स्टेशनवर ड्युटी सुरू असताना उपस्टेशन प्रबंधक अनिलकुमार तिवारी यांना रेल्वे गार्ड विल्यम यांनी प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर एक वृद्ध महिला रडत असल्याची माहिती दिली. यावर तिवारी यांनी महिलेची विचारपूस केली यावर तिने ट्रेनमध्ये बॅग चोरीला गेल्याचे सांगितले. या बॅगेत काही रोख रक्कम, महत्त्वाचे कागदपत्रे आणि कपडे होते. पुढे वृद्ध महिलेने सांगितले की ती वाराणसीची रहिवासी आहे आणि घरगुती वादातून एकटीच घराबाहेर पडली आहे.

Solapur Accident : पायी चालणाऱ्या वारकऱ्यांवर दुःखाचा डोंगर, दिंडीत कार घुसल्याने 7 जणांचा मृत्यू

यानंतर रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक बी. एस. रघुवंशी, सामाजिक संस्था “साथी” च्या सहाय्यक श्रीमती रेखा गायकवाड आणि सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती रेणू तिवारी यांनी परोपकाराच्या भावनेने कार्य करत जीआरपीच्या मदतीने वृद्ध महिलेला “अपना घर” या हिंजवडी येथील सामाजिक संस्थेच्या सुपूर्द केले जी निराधार, निराश्रित महिलांना मदत करते. या संस्थेचे संचालक राजीव अग्रवाल आहेत.(Pune news) अपना घर ने या वृध्द महिलेची पाच दिवस काळजी घेत तिला काही रोख रक्कम दिली आणि त्यांचा मुलगा, सून पुण्याला येताच त्यांनी वृद्ध महिलेला वाराणसी प्रवासाचे आरक्षित तिकीट देऊन त्यांच्या सुपूर्द केले. या मदत कार्यासाठी वृद्ध महिलेच्या कुटुंबीयांनी रेल्वे आणि सामाजिक संस्थेचे खूप आभार मानले.

या परोपकारी कार्याबद्दल विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेशकुमार सिंह यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.