Pune : पुणे जिल्ह्यात आरोग्य सेवा बळकटीकरणावर भर – पालकमंत्री

एमपीसी न्यूज – जिल्हा नियोजन समितीच्या (Pune) आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीतून आरोग्य केंद्र आणि शाळांच्या पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील आरोग्य सेवांचे बळकटीकरण करुन नागरिकांना उत्तम प्रकारे आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

पुणे जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात आयोजित उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे, आशा स्वयंसेविका पुरस्कार आणि कायाकल्प बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, पुणे मनपाचे आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा नियोजन समिती सदस्य काळूराम नढे, शरद बुट्टे पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या काळात आरोग्य यंत्रणेने जीवाची पर्वा न करता निस्वार्थपणे सेवा देऊन संकटातून बाहेर काढले, असे गौरवोद्गार काढून पालकमंत्री म्हणाले, कोरोना संकटात सेवा बजावताना जिल्ह्यातील 38 आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. त्यांच्या बलिदानाची दखल घेत त्यांचे जिल्हा परिषदेत येथे स्मारक उभारण्याचे काम सुरु असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल.

निष्ठापूर्वक करीत असलेल्या कार्याची दखल बक्षिसाच्या स्वरूपात घेतली जाते असे सांगत पालकमंत्र्यांनी पुरस्कार प्राप्त आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्नशील राहू, अशीही ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, महाराष्ट्र राज्याची कठीण प्रसंगात त्यागाची, बलिदानाची परंपरा असून कोरोनाच्या महामारीच्यावेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता राज्याच्या संस्कृतीला शोभेल असे काम आरोग्य विभागाने केले आहे. कोरोनाच्या काळात बलिदान दिलेल्या आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, आशा स्वयंसेविका आदींना न्याय देण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे.

यावेळी 2022-23 आर्थिक वर्षात उत्तम कामगिरी केलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र, वाघोली, ता. हवेली (प्रथम क्रमांक), प्राथमिक आरोग्य केंद्र, मांडवगण फराटा, ता. शिरुर (द्वितीय क्रमांक), आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, केंदूर, ता. शिरुर (तृतीय क्रमांक) यांचा तसेच तालुकास्तरीय प्रथम व द्वितीय पुरस्कार (Pune) देऊन प्राथमिक आरोग्य केंद्राचा सन्मान करण्यात आला.

आशा स्वयंसेविका पुरस्कार अंतर्गत हवेली तालुक्यातील वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा स्वयंसेविका मयुरी रवी पवार यांना जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक, शिरूर तालुक्यातील रांजणगाव प्राथ. आरोग्य केंद्राच्या शोभा सोनबा खेडकर यांना द्वितीय क्रमांक, पासली प्राथ. आरोग्य केंद्राच्या (ता. वेल्हा) राणी बापू जोरकर यांना जिल्हास्तरीय तृतीय पुरस्कार तर तळेगाव ढमढेरे प्राथ. आरोग्य केंद्राच्या (ता. शिरूर) आरती अमोल घुले यांना जिल्हास्तर प्रथम गट प्रवर्तक पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच आशा स्वयंसेविकांना तालुकास्तरीय प्रथम, द्वितीय पुरस्कारही वितरित करण्यात आले.

Pune : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा उत्कृष्ट बनविण्याचे शालेय शिक्षणमंत्र्यांचे निर्देश

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.