Pune : बालपणीच्या मैत्रीचा गैरफायदा, फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर बलात्कार

एमपीसी न्यूज -लहानपणापासून मित्र असलेल्या एकाने (Pune) मैत्रीचा गैरफायदा घेतला. दोघांचे एकत्र असलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली आणि 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केलाय. चंदन नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा संपूर्ण प्रकार घडला. पीडित तरुणीने या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपी आसिफ रहीम शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : पुण्यातील चामुंडा मातेच्या मंदिरातून देवीच्या अंगावरील दागिन्यांची चोरी

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित तरुणी आणि फिर्यादी हे लहानपणापासूनचे मित्र आहेत. त्या दोघांचे एकत्र असलेले साधे फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी आरोपीने पीडितेला दिली. त्यानंतर तुझ्या मामाला ठार मारेल अशी धमकी देऊन फिर्यादी सोबत जबरदस्तीने शरीर संबंध केले आहेत. तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला (Pune) असून अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.