Pune : कर्जबाजारीपणाला कंटाळून वाघाळे येथे शेतकऱ्याची आत्महत्या

एमपीसी न्यूज – वाघाळे तालुका शिरूर येथील एका शेतकऱ्याने ट्रांसफार्मर (रोहित्र) मध्ये हात घालून विजेचा धक्का घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि. 6 रोजी) घडली आहे.

भिवाजी बबन शेळके (वय 42 वर्ष, रा .वाघाळे, ता शिरूर) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

कर्जवसुलीसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पाठवलेली वसुलीची नोटीस व अतिवृष्टीमुळे झालेले शेतीचे नुकसान यामुळे शेळके यांनी आत्महत्या केल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी त्यांचे पुतणे सोमनाथ रामदास शेळके यांनी शिक्रापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.

शिक्रापूर पोलीस आणि फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सोमनाथ शेळके हे आपल्या शेतामध्ये काम करत होते. दुपारच्या सुमारास शिवाजी शेळके हे उघड्या अंगाने रस्त्याने रडत चालले होते. त्यांच्या पाठीमागून त्यांच्या पत्नी पळत येत होत्या.

अचानकपणे रस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रान्सफरमध्ये शेळके यांनी आपला हात घातला व विजेच्या धक्क्याने त्या ठिकाणी खाली तडफडत पडले. तिथे जवळच शेतात काम करत असलेल्या युवकांनी त्यांना शिक्रापूर येथे रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शेळके यांच्या नातेवाईकांनी त्यांना जिल्हा बँकेने कर्ज वसुलीची पाठवलेली नोटीस व नापिकी झाल्यामुळे कर्ज झाले होते. यामुळे त्यांनीआत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like