BNR-HDR-TOP-Mobile

Pune : आठ वर्षाच्या मुलीचा खून करून पित्याची आत्महत्या

एमपीसी न्यूज- स्वतःच्या आठ वर्षाच्या मुलीचा गळा आवळून खून करून पित्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुण्यात धनकवडी भागात काशिनाथ पाटीलनगर येथे उघडकीस आली. या प्रकरणी रविवारी रात्री सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

श्रद्धा आशिष भोंगळे (वय ८, रा. काशिनाथ पाटीलनगर, धनकवडी) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे तर आशिष भोंगळे (वय ४९) असे मुलीचा खून करून आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष भोंगळे वाहनचालक होता. कौटुंबिक वादामुळे त्याची पत्नी नांदत नाही. आशिष आपली आई, मुलगा आणि मुलीसह धनकवडीतील काशिनाथ पाटीलनगर परिसरात राहत होता. शनिवारी संध्याकाळी आशिषची आई कामानिमित्त बाहेर पडली. श्रद्धा आणि आशिष घरात होते. आशिषने श्रद्धाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर साडीच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

कौटुंबिक वादातून ही घटना घडली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास सुरु आहे.

HB_POST_END_FTR-A2

.