Pune : धीरेंद्र शास्त्री यांच्यावर गुन्हा दाखल करा,अंनिसने दिले पोलिसांना निवेदन

एमपीसी न्यूज – धीरेंद्र शास्त्री यांचा पुण्यातील संगमवाडी परिसरात तीन दिवसीय सत्संग आणि दरबार आयोजित केला होता.भाजप चे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी या  कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

अशास्त्रीय, अवैज्ञानिक, घटनाबाह्य, दिशाभूल, फसवणूक करणारे आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे वक्तव्य, भाष्य, कृत्य धिरेंद्र शास्त्री सतत करत असून त्याची पुनरावृत्ती पुण्यात देखील झाली आहे, असा आरोप महाराष्ट्र अंनिसने केला असून धीरेंद्र शास्त्री यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करा अशी मागणी केली आहे.

PCMC : नदी सुधार योजना लाल फितीच्या कारभारामुळे रखडली..

वर्दीवर असणारे पोलीस अधिकारी हे धीरेंद्र शास्त्री यांच्या दरबारात जाऊन शास्त्रींपुढे नतमस्तक झाले. त्यांनी अशास्त्रीय पद्धतीने समस्यांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केला असून त्यांचे दरबारात जाणे हे महाराष्ट्र सेवा अधिनियम व तत्सम कायद्यांचा भंग करणारे आहे. त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली.

धीरेंद्र शास्त्री हे लोकांच्या देव, धर्म, श्रद्धा, उपासना आणि भावना, अगतिकता, अज्ञान यांचा गैरफायदा घेऊन लोकांना देव धर्म श्रद्धा उपासनेशी निगडित विसंगत, अशास्त्रीय, अवैज्ञानिक बाबी सांगत आहेत, त्यांच्यावर कारवाई करा, असे महाराष्ट्र अंनिस संघटनेचे म्हणणे आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.