Pune : विद्यापीठातील सेट प्रकरण; कुलगुरूंचा माफीनामा तर नागराज मंजुळे यांचे कानावर हात !

एमपीसी न्यूज- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मैदान दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना चित्रपटाच्या शूटिंगसाठी भाड्याने देण्याची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारतो, हा प्रयोग फसला. याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो असे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले. पण नागराज मंजुळे यांनी मात्र मला या प्रकरणातील काहीच आकलन नसल्याचं सांगत कानावर हात ठेवले आहेत.

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी विद्यापीठाचे मैदान भाड्याने देण्यात आले होते. त्यामुळे विद्यापीठाचे १४ कोटी ४० लाख रुपयांचे नुकसान झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.