Pune Fire: वैदुवाडीतील आगीत 12 झोपड्या जळून खाक

एमपीसी न्यूज: हडपसर येथील वैदुवाडी झोपडपट्टी भागात रविवारी (दि.17) पहाटे आग लागली.या आगीमध्ये 12 झोपड्या या जळून खाक झाल्या आहेत. (Pune Fire) सुदैवाने या आगीत कोणतीही जीवीत हानी झालेली नाही.

 

आगीचे कारण मात्र अद्याप कळू शकलेले नाही. घटनास्थळी हडपसर अग्निशामक दलाच्या तीन गाड्या पहाटे तीनच्या सुमारास दाखल झाल्या. वसाहत रस्त्याच्या कडेला असल्याने आग विझवणे सोपे गेले. अवघ्या 15 मिनीटात आग विझवली व पुढे 20 मिनीटात कुलींग करण्यात आले. (Pune Fire) यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र घरे चिकटून चिकटून असल्याने पत्र्याच्या 12 झोपड्या या आगीत जळून भस्मसात झाल्या, अशी माहिती फायरमन विलास दडस यांनी दिली.ही कारवाई फायरमन सोमनाथ मोटे, विलास दडस, संजय जाधव, सत्यम चौकुंडे, दत्तात्रय वाघ यांनी केली.

 

Pune Hukka Parlour: मुंढव्यात पुन्हा अवैध हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेचे छापे

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.