Pune Hukka Parlour: मुंढव्यात पुन्हा अवैध हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेचे छापे

10 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज:  पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मुंडवा परिसरात सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लर वर छापे टाकले. (Pune Hukka Parlour) घोरपडी रस्त्यावरील हॉटेल बॉटल फॉरेस्ट आणि हॉटेल ब्लू शेक या दोन ठिकाणी ही कारवाई केली. या कारवाईत दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तब्बल 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 
हॉटेल बॉटल फॉरेस्टचा मालक रोहित किसन (वय 29), हॉटेल व्यवस्थापक देवराम मांगीलाल जैन (वय 32), वेटर सरोज लाल मुखिया कुमार आणि गोविंद सुरेंद्र मुखिया, पवन मुखिया, जोगिंदर मुखिया अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune Hukka Parlour) त्यांच्याकडून 33 हजार रुपयांचे हुक्का फ्लेवर, हुक्का स्पॉट आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.

Today’s Horoscope 17 July 2022- जाणुन घ्या आजचे राशिभविष्य

 

तर हॉटेल ब्लू शाक या हॉटेल वरील छाप्यात हॉटेल चालक अभय दिवाकर मिश्रा (वय 41), ग्राहकांना सर्विस देणारे अशोक कुमार गौड, गोलू निहरी रामकुमार, बाबू कालू शेख आणि भरत उत्तम लाल कामत यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मुंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.