Pune : कत्तलीसाठी जनावरांची विक्री केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल; एकास अटक

एमपीसी न्यूज – कत्तलीसाठी जनावरांची विक्री (Pune) केली. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 31) दिघी ते खडक पुणे या दरम्यान घडली.

परवेज बिलाल कुरेशी (वय 21, रा. हडपसर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह तबरेज बिलाल कुरेशी (वय 18, रा. हडपसर), सूर्या (रा. चौफुला, पुणे), राहुल (रा. चौफुला पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार हेमंत गाढवे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Chinchwad : कष्टकऱ्यांनो, पेन्शन आणि सामाजिक सुरक्षेसाठी संघर्ष करा – मेधा पाटकर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल आणि सूर्या या दोघांनी पाच जनावरे आरोपी परवेज याला कत्तलीसाठी विकली. परवेज याने तबरेज याला ती जनावरे विकली. त्यानंतर आरोपींनी जनावरांची निर्दयतेने वाहतूक केली. तसेच त्यांच्या चारा पाण्याची सोय न करता मार्केट यार्ड येथे कत्तलीसाठी विक्री करण्यासाठी नेली. याबाबत पोलिसांनी कारवाई केली असता आरोपींकडे एक कोयता आढळून आला (Pune)असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.