Pune : जुन्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी केली एका व्यक्तीला लोखंडी रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या (Pune) कारणावरून चार जणांनी मिळून एका व्यक्तीला लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 16) रात्री सव्वा नऊ वाजता पुणे-नाशिक महामार्गावर बर्गेवस्ती, कुरुळी येथे घडली.

गोविंद भागवत भिसे (रा. भोसरी) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी गोविंद यांचा मुलगा शुभम गोविंद भिसे (वय 24) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दत्ता डोके, शकुंतल डोके आणि दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhosari : पाय हलवू नको म्हटल्याने पतीला बांधून चाकुने केले वार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि (Pune) त्यांचे वडील आपापल्या दुचाकीवरून घरी जात होते. बर्गेवस्ती येथे आल्यानंतर आरोपींनी त्यांना अडवले. 14 सप्टेंबर रोजी फिर्यादी यांच्या शॉप समोर झालेल्या भांडणाच्या रागातून आरोपींनी फिर्यादी यांच्या वडिलांना धमकी देत लोखंडी रॉडने मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.