Pune : ‘पुणे पुस्तक महोत्सवा’त होणार चार विश्वविक्रम – राजेश पांडे

एमपीसी न्यूज – ‘राष्ट्रीय पुस्तक न्यासा’च्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या (Pune) मैदानावर 16 ते 24 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या ‘पुणे पुस्तक महोत्सवा’त चार विश्वविक्रम प्रस्थापित केले जातील अशी माहिती महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी आज दिली.

पांडे म्हणाले, ‘पुण्याची वाचन संस्कृती जगात नेण्यासाठी या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यांची नोंद ‘गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये व्हावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलांना एकाच वेळी वाचन करून दाखविण्याचा उपक्रम दिनांक 14 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर केला जाणार आहे. पुणे महापालिकेच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

जास्तीत जास्त पुस्तकांनी तयार केलेला शब्द हा विक्रम 15 डिसेंबर रोजी फर्ग्युसन महाविद्यालयात करण्यात येणार आहे. ‘भारत’ या शब्दात अधिकाधिक पुस्तकांची रचना केली जाणार आहे.

Chikhali : ‘हॉर्स रायडिंग’प्रकरणी सोसायटी फेडरेशन आक्रमक

‘जयतू भारत’ या वाक्यात जास्तीत जास्त पुस्तकांचा समावेश असेल. (Pune) हा तिसरा विक्रम 16 डिसेंबर रोजी प्रस्थापित केला जाईल. अधिकाधिक लोकांनी मोठ्याने वाचन करण्याच्या व्हिडिओ अल्बमचा विश्वविक्रम 21 डिसेंबर रोजी केला जाईल.

युनेस्कोच्या निकषांनुसार जागतिक पुस्तकांची राजधानी बनण्याची क्षमता पुणे शहरात आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या उद्देशाने या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे पांडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.