Pune : मालमत्ता कर वसुलीमध्ये पुणेकरांना 34 गावांप्रमाणे दिलासा द्या – संजय मोरे

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेच्या (Pune) माध्यमातून पुणेकरांच्या मिळकतकर थकबाकी आकारणीत पुणे मनपा प्रशासनाने जोर धरला असून नागरिकांच्या दारात जाऊन बँडबाजा लाऊन वसुली केली जात आहे. याउपर मागील आठवड्यात 34 गावांमधील लोकप्रतिनिधी, नागरिक यांना भेट देऊन पुणे महापालिका आयुक्त यांस तात्काळ या 34 गावामधील मिळकतकर वसुलीविषयी जप्तीची कारवाई थांबविण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. आपण पालकमंत्री संपूर्ण पुणे शहर व जिल्ह्याचे आहात. या नात्याने पुणेकरांना पण मिळकतकर कारवाईमधे सहकार्य करावे, अशी मागणी शिवसेनेचे (ठाकरे गट) शहर प्रमुख संजय मोरे यांनी केली आहे.

पुणे शहरातील मिळकतकर थकबाकीदारांवरील कारवाई थांबवून समाविष्ट 34 गावाप्रमाणे पुणेकरांना समान न्याय देण्यात यावा. अन्यथा पुणेकरांना वेगळा न्याय आणि ३४ गावांना न्याय देताना बारामती – शिरूर लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वेगळा न्याय दिला, असे वाटायला नको. आपण पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नेते आहात, त्यामुळे ग्रामीण भागातील समस्यांकडे आपला कल असणे स्वाभाविक आहे.

Nigdi : रानजाई महोत्सवात नेचर फॅशन वॉक

समाविष्ट 34 गावातील नागरिकांना कारवाईमधून दिलासा मिळाला याचा मनस्वी आनंद आहेच. परंतु, पुणे शहरातील नागरिकांना मिळकतकर कारवाईमधून दिलासा देण्याचे टाळले याचे खूप दुःख वाटत आहे. नैसर्गिक (Pune) न्याय तत्वावर एकाच विषयाचे दोन निर्णय होऊ शकत नाही. त्यामुळे आपण मिळकतकर वसूलीसंदर्भात घेतलेला निर्णय फक्त समाविष्ट 34 गावांपुरता मर्यादित न ठेवता पुणे शहरासाठी सुध्दा अंमलबजावणी केल्यास ते योग्य व न्यायाचे होईल. पुणेकरांच्या हितासाठी आपण तत्परतेने आदेश द्यावा, अशी विनंती मोरे यांनी अजित पवार यांना देण्यात आलेल्या पत्राद्वारे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.