Chinchwad News: चिंचवडगावात पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक

एमपीसी न्यूज – महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा चालवल्या असे विधान करणा-या भारतीय जनता पार्टीचे नेते, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज (शनिवारी) चिंचवडगावात कार्यक्रमासाठी आलेल्या पालकमंत्री पाटील यांच्या तोंडावर शाई फेकण्यात आली.

चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजित 461 व्या श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाच्या उद्घाटनासाठी पालकमंत्री पाटील आले आहेत. या पार्श्वभूमीवर विविध समाज संघटनानी आक्रमक होत. आंदोलन केले. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चिंचवडगाव परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला होता. परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.

Vadgaon Maval : दिवंगत माजी आमदार दिगंबर भेगडे यांच्या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन

दरम्यान, पालकमंत्री पाटील हे भाजपचे माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांच्या निवासस्थानी गेले होते. निवासस्थानातून बाहेर पडताना त्यांच्या तोंडावर शाईफेक करण्यात आली आहे. शाई फेक करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. मनोज गरबडे असे या तरुणाचे नाव आहे. पिंपरी चिंचवड परिसरात तो आंबेडकर चळवळीची कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो. काही दिवसांपूर्वी पिंपरी मनोज गरबडे याच्या पुढाकाराने संविधान जनजागृती अभियान राबवण्यात आले होते. मनोज सह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे. फुले, आंबेडकर आणि कर्मवीर हे अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहिले नाहीत. त्यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या, अशा आशयाचे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्या विधानानंतर विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.