Pune : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेला आर्थिक मदत करा : आयुक्त

आरोग्य कर्मचाऱ्यांकडून पुरस्काराची रक्कम लढ्यासाठी महापालिकेला मदत

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या साथरोगाचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेला सढळ हाताने आर्थिक मदत करावी, असे आवाहन महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले. 

 

स्वच्छ पुरस्कार २०१९-२०२० अंतर्गत प्रमुख आरोग्य निरीक्षक संवर्गात प्रथम क्रमांक मिळविणारे शिवाजीनगर-घोलेरोड क्षेत्रिय कार्यालयाचे  प्रमुख आरोग्य निरीक्षक इमामुद्दीन सिराजउद्दीन इनामदार, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक संवर्गात उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविणारे नगररोड क्षेत्रिय कार्यालयाकडील वरिष्ठ आरोग्य निरीक्षक अनिल डोळे, आरोग्य निरीक्षक संवर्गात उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविणारे नगररोड क्षेत्रिय कार्यालयातील आरोग्य निरीक्षक मुकुंद घम आणि मोकादम संवर्गात द्वितीय क्रमांक मिळविणारे नगररोड क्षेत्रिय कार्यालयातील मुकादम गणेश रणवरे यांनी त्यांना मिळालेली  स्वच्छ पुरस्कार 2019-20 अंतर्गत पुरस्काराची  रक्कम आयुक्तांकडे जमा केली. त्यावेळी  आयुक्तांनी महापालिकेला कोरोनाच्या लढ्यासाठी आर्थिक मदत कण्याचे आवाहन केले.

 

सोमवारी महापालिका आयुक्त कोविड 19 या ही  फंडामध्ये सुपूर्द करण्यात आली.   इनामदार यांच्याकडून  २१ हजार, तर डोळे, घम व रणवरे यांनी प्रत्येकी ७ हजार रुपये असे   एकूण  ४२  हजार रुपये  महापालिका आयुक्त कोविड 19 या  फंडामध्ये सुपूर्द करण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वर मोळक, सह महापालिका आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.