Pune : दवाखाने बंद ठेवणाऱ्या डॉक्टर्सवर कारवाई व्हावी – हेमंत रासने

एमपीसी न्यूज : कोरोनाच्या संकटात दवाखाने पूर्ण वेळ अथवा अर्धा वेळ बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी महापालिका स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पुणे शहराच्या विविध भागांमध्ये काही छोट्या दवाखान्यांमध्ये बाह्यरुग्ण विभाग आणि डिस्पेंन्सरी निर्धारित वेळेत कार्यरत नसतात, अशा तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या आहेत. वैद्यकीय सेवा ही आपत्ती व्यवस्थापन आणि साथ, रोग कायद्यांतर्गत अत्यावश्यक सेवा आहे. ती बंद असणे गंभीर बाब आहे.

त्यामुळे जे वैद्यकीय व्यावसायिक आपले दवाखाने पूर्ण अथवा अर्ध वेळ बंद ठेवतील त्यांच्यावर कारवाई व्हावी. तसेच संबंधितांना योग्य ते आदेश द्यावेत, असे रासने यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.