Pune: ब्राह्मण महासंघातर्फे चिनी वस्तूंची होळी करून जोरदार निदर्शने

Pune: Holi of Chinese Goods by Brahmin Mahasangh, Statewide Protest

एमपीसी न्यूज – ब्राह्मण महासंघातर्फे सोमवारी संपूर्ण महाराष्ट्रात चिनी वस्तूंची होळी करून जोरदार निदर्शने करण्यात आली. एकाच वेळी राज्यात 72 ठिकाणी हे आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला. संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांच्या नेतृत्वाखाली महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यकर्त्यां समवेत निदर्शने केली. पुण्यात कर्वे रस्त्यावरील सावरकर स्मारक येथे हे आंदोलन करण्यात आले. 

आज भारताला आत्मनिर्भर बनायचे आडे तर स्वतःला सक्षम बनवले पाहिजे. आज सर्वच पातळीवर चीन आपल्याला शह देण्याचा प्रयत्न करीत आहे. जगात फार मोठ्या प्रमाणात चिनी मालाला मागणी आहे. ब्राह्मण महासंघातर्फे चीन विरुद्ध पेटविलेल्या छोटी ठिनगीचे रुपांतर लवकरच वणव्यात होऊन एक मोठे जनआंदोलनात होणार असल्याचे आनंद दवे यांनी सांगितले.

याच धर्तीवर ब्राम्हण महासंघाने चायना वस्तूंविरोधात जनआंदोलनाला सुरुवात केली आहे. चायना वस्तूंची होळी करून स्वदेशी अपनाओ, देश बचाओ, हा नाराही दिला आहे. देशातील कोणत्याही क्रांतीची सुरवात लहान आंदोलांतूनच होते. पुण्यातून हे आंदोलन झाल्याने ती यशस्वी सुद्धा होतात. छत्रपती इथले, टिळक इथले, चाफेकर आणि सावरकर सुद्धा इथलेच. चीन आपली गरज नाही, आपण चीनची आवश्यकता आहोत, असेही यावेळी सांगण्यात आले.

आपण खरेदी केलेल्या चिनी मालावर चीन दिवसेंदिवस आर्थिकदृष्ट्या सक्षम होत चालला आहे. या सक्षमतेचा उपयोग हा आपल्या विरोधात करीत आहे. त्यामुळे या चीन वर बहिष्कारची सुरुवात पण आपणच करणार आहोत, असा इशाराही ब्राम्हण महासंघातर्फे देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.