Pune Corona Update : शहरात कोरोनाच्या 166 रुग्णांना डिस्चार्ज, 13 जणांचा मृत्यू, 181 नवे रुग्ण

Pune Corona Update: Discharge of 166 patients of Corona in the city, 13 deaths, 181 new patients

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील कोरोनाचे 166 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना आज, सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला. तर 13 जणांचा या रोगामुळे मृत्यू झाला. यामध्ये 8 पुरुष आणि 5 महिलांचा समावेश आहे. तर, 166 नवे रुग्ण आढळले.

सध्या शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 204 क्रिटिकल रुग्ण असून यापैकी 43 जण व्हेंटिलेटरवर आहेत. पुण्यात आज १३ जणांचा मृत्यू झाला असून, पुण्यातील मृतांचा आकडा आता 391 झाला आहे.

शहरात कोरोनाचे एकूण 8 हजार 62 रुग्ण आहेत. तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 5 हजार 181 आहे. सद्यस्थितीत 2 हजार 486 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज कोरोनाच्या 2 हजार 108 चाचण्या करण्यात आल्या, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

दरम्यान, चंदननगरमधील 65 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, नाना पेठेतील 78 वर्षीय पुरुषाचा केईएम हॉस्पिटलमध्ये, मार्केटयार्ड भागातील 70 वर्षीय पुरुषाचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये, नाना पेठेतील 67 वर्षीय महिलेचा केईएम हॉस्पिटलमध्ये, गोखलेनगरमधील 30 वर्षीय पुरुषाचा धनकवडीतील भारती हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

तसेच पर्वतीमधील 65 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, कोंढवा खुर्दमधील 72 वर्षीय पुरुषाचा नोबेल हॉस्पिटलमध्ये, घोरपडीतील 60 वर्षीय पुरुषाचा केईएम हॉस्पिटलमध्ये, पुणे कॅम्पमधील 64 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, धनकवडीतील 70 वर्षीय महिलेचा भारती हॉस्पिटलमध्ये, आंबेडकर वसाहतमधील 35 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, खराडीतील 69 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 70 वर्षीय महिलेचा ससून रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला.

पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता 8 हजारांच्या पुढे गेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.