Pune : जनसेवा सहकारी बँकेतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याना अभिवादन

एमपीसी न्यूज- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंती निमित्त जनसेवा बँकेच्या वतीने डाॅ आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.

यावेळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय काकडे, बँकेचे अध्यक्ष सतीश गोरडे, उदय काकीडे, संचालक बाळासाहेब कचरे, सूर्यकांत शिर्के, संदीप सारडा, पांडुरंग गायकवाड, संघटनेचे अध्यक्ष श्रीनिवास खळदकर, सेवक संचालक राकेश दाभाडे, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक जोशी, सरव्यवस्थापक किशोर घोळबा, समीर कारकीकर उपस्थित होते.

या निमित्त जलपेयपान वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. बुद्ध वंदना होऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.