Pune News : पतीचे विवाहबाह्य संबंध, पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज : पतीच्या विवाहबाह्य संबंधांना आणि सासू-सासर्‍यांच्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केली. (Pune News) याप्रकरणी पुण्यातील सहकार नगर पोलीस ठाण्यात पती आणि सासू सास-याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 26 डिसेंबर रोजी ही घटना घडली.

कोमल तांबे (वय 22) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेची नाव आहे. याप्रकरणी तिचा पती भिवराज तांबे, याच्यासह जगन्नाथ तांबे आणि शेवंता तांबे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनाही अटक करण्यात आली आहे. मयत महिलेच्या वडिलांनी याप्रकरणी तक्रार दिली.

Pune Crime : अनोळखी तरुणाच्या मृत्यूचा पोलिसांनी अशाप्रकारे लावला छडा.. रिक्षा चालकाला अटक

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांची मुलगी कोमल तांबे हिला आपल्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती मिळाली होती. पतीने याविषयी पतीला विचारणा केली असता तू शांत रहा जास्त कालवा केल्यास वाईट परिणाम भोगावे लागतील अशी धमकी तिला दिली होती.(Pune News) तर इतर आरोपींनी मयत कोमल हिला घरातील कामावरून शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन तू पुणे येथे राहायचे नाही तू आमच्या सोबत गावी राहायचे असे बोलून तिला त्रास दिला. या सर्व त्रासाला कंटाळून कोमल हिने आत्महत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.