Pune : पंकजाताई पक्ष सोडतील, असे अजिबात वाटत नाही – सुषमा अंधारे

एमपीसी न्यूज : मागील काही दिवसांपासून भाजपच्या (Pune) नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे पक्षातील नेत्यांवर नाराज आहेत. त्यामुळे त्या पक्ष सोडतील अशी चर्चा सुरू आहे. त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. त्याबाबत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना विचारले असता, त्या म्हणाल्या की, पंकजाताई पक्ष सोडतील, असे अजिबात वाटत नाही.

तसेच गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे या दोन्ही नेत्यांच्या मैत्रीबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्यापूर्वी देखील एकनाथ खडसे हे गोपीनाथ गडावर गेले होते. तसेच मी आणि संजय राऊत बीड येथील महाप्रबोधन सभेदरम्यान गोपीनाथ गडावर जाऊन दर्शन घेतले होते.

Pune : नितेश राणे लहान पोर.. सुषमा अंधारे यांची टीका

त्यामुळे गोपीनाथ मुंडे हे एका पक्षापुरते मर्यादित नसून ओबीसी समाजाचे (Pune) नेते म्हणून गोपीनाथ मुंडे यांच्याकडे पाहिले जाते, अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.