Pune : आंबील ओढ्यावरील अतिक्रमणे तातडीने काढणार; महापालिका बैठकीत निर्णय

एमपीसी न्यूज – आंबील ओढ्यावरील अतिक्रमणे तातडीने काढण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यासंबंधीची बैठक आयोजित केली होती.

या बैठकीला महापालिका आयुक्त सौरभ राव, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेता धिरज घाटे, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, नगर अभियंता प्रशांत वाघमारे, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, माजी सभागृह नेते सुभाष जगताप, नगरसेवक महेश वाबळे, संबधीत खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत मिळाली नाही. त्याचाही यावेळी आढावा घेण्यात आला. नाल्यालगत बांधकाम व्यवसायिकांना बांधकामांची परवानगी देण्यात आली आहे, ती रद्द करणे यावरही चर्चा झाली. कात्रजपासून धायरी पर्यंतच्या ओढ्याचा यावेळी आढावा घेण्यात आला.

280 कोटी रुपयांचा विकास आराखडा आंबील ओढ्याचा तयार करण्यात आला आहे. त्यातील 70 कोटी आता उपलब्ध आहेत. त्यामुळे कामे सुरू करता येईल, असे सभागृह नेते धिरज घाटे यांनी सांगितले. तर, ड्रेनेज, पाणी, रस्ते, अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने अतिक्रमणे काढण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.