Pune : मुठा कालव्याशेजारी बेकायदा टाकण्यात आलेल्या केबलची चौकशी होणार !

एमपीसी न्यूज- खडकवासला धरणातून पुणे शहराला आणि पुढे जिल्ह्याच्या पूर्व भागात जाणारा मुठा उजवा कालवा गुरुवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास दांडेकर पुलाजवळ फुटल्याने सिंहगड रस्त्यावर हाहाकार उडाला होता. मुठा कालव्याशेजारी बेकायदा टाकण्यात आलेल्या केबलमुळे कालवा फुटल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या केबल बाबतची चौकशी करण्यात करण्यात येईल, असे आश्वासन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिले आहे.

ज्या ठिकाणी कालवा फुटला होता त्या ठिकाणापासून पाच फुटावर बेकायदेशीरपाने कालव्याच्या भिंतीमध्ये तब्बल 5 केबल टाकण्यात आल्या असल्याचे निदर्शनास आले होते. त्यापैकी 2 केबल खासगी कंपन्यांच्या असून काही केबल महावितरणच्या आहेत. अतिशय धक्कादायक बाब म्हणजे कालव्याची भिंत खोदून या केबल टाकण्यात आल्याचे दिसत असून कालव्याच्या पाण्यापासून अवघ्या तीन ते पाच फुटावर ही केबल टाकण्यात आली आहे. त्यामुळे ही केबल खोदताना कालव्याची भिंत फोडल्याने त्याचा परिणाम म्हणून ही घटना घडली असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत

भरावात केबल टाकण्यास परवानगी नाही. याची चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.